म माणूसकीचा


घरी renovation च काम चालू होतं,
आई कारागीरांना दिलेलं पाणी संपलय का? ते जेवत असतील तर त्यांना भाजी, लोंच नेउन देणं असं रोज करायची. ही जरी साधारण गोष्ट असली तरी आजूबाजू घडणाऱ्या ह्या गोष्टी माणसाला नेहमीच माणूस म्हणून जगवण्याची प्रेरणा देतात.
आणि मनुष्य प्राणी असा आहे की स्वतःच एक व्यवस्था बनवून स्वतःच त्यात फाटे तयार करत असतो. म्हणजे ह्या बोलण्यातून बरीच नकारात्मकता डोकावू शकते पण काहींची माणुसकी स्वतःच्या कोशापूरती मर्यादित असते. अर्थात हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी त्यातला बड़ेजाव मात्र कमी व्हायला पाहिजे.
काय बरं व्याख्या होईल माणुसकीची?
पाहायला गेलं तर विशिष्ट अशी काहीच नाही..
कधी कधी सतत नजरानजर होऊन खुप ओळख असल्यागत चेहरयावर smile येते. हेच असतं ना माणूसपण?
नुसतं रोज एकाच बस किंवा रेल्वेने प्रवास करतांना दिसतोय म्हणून बोलायला सुरुवात होते आणि बस/रेल्वेचा प्रवास मैत्री कड़े पण चालू होतो. हीच असते ना माणसाच्या आतली भावना?
समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू पाहून आपल्यालाही भावनाविवश व्हायला होतं.. ही असते ना माणसाची संवेदनशीलता?
रस्त्याने एखादी हतबल व्यक्ती किंवा कधी कधी प्राणिमात्र देखील दिसतात तेव्हा त्यांना मदतीसाठी हात सरसावतात आणि कधी कधी नेमकं काय करावं हे कळत नाही मग दिवसभर मन खट्टू राहतं.. हीच असते ना माणसामधली दयेची भावना?
ह्या सर्व आपल्यातल्या चांगूलपणाला जिवंत ठेवणाऱ्या भावना आहेत. मग ह्यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या नकारात्मक भावनांच काय?
ह्या सृष्टीवर इतर सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणूसच वर्चस्व स्थापन करू शकला. कसं?
तर स्वतःच्या बुद्धीच्या बळावर..
मग ही माणसाचीच जवाबदारी बनते की इतर प्राण्यांमध्ये असलेले क्रोध, हिंसा यासारख्या भड़क वैशिष्ट्यांवर मात करणे आणि सर्वत्र सकारात्मक्ता रुजवणे.
अशा छोट्या छोट्या गोष्टी जगून आपण समृद्ध व्हायचा प्रयत्न करत असतो तेव्हा समाजातलं ढोंगीपण (विशेषतः बाबा बुवा) पाहून प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या प्रमाणात माणसांची फसवणूक करून कसं जगता येत असेल? ह्याच गोष्टी कारणीभूत ठरतात माणसाचा एकमेकांवरून विश्वास उडायला..
     राज असरोंडकर यांनी सूंदर शब्दात सांगितलय- माणसांचे धन मजकडे, माणसेच संपत्ती, गड़गंज माणुसकीचा मालक मी!
काही गोष्टी विचार करायला लावतात.. भयावह ठरतात.. बॉर्डर्स चा विचार करून आपण माणुसकी ठरवत नाहीये ना? कारण बॉर्डर पलिकडेही माणसच आहेत.. हे समस्त पृथ्वीवासीयांना लवकरात लवकर उमगण्याची गरज आहे. आपल्या माणूसपणाचा विस्तार त्या तिकडे पलीकडे असणाऱ्या ग्रहांवरच्या जीवांसोबत पण होईल का? जर कल्पनेची क्षितिजे दुसऱ्या ग्रहांवरच्या जीवांच्या शोधात असतील तर वास्तवातल्या जीवांना प्रेमाने वागवणे अगत्याचेच ठरते.
ह्या माणुसकीच्या गोष्टी फक्त Social Media वर शेयर करण्यापुरत्या मर्यादित नको रहायला. त्या जगायच्या आहेत.. यंत्रवत जगणं सुकर बनतं पण जीवन यंत्र बनू नये. ते आपल्याला एकमेकांसोबत माणुसकीनेच घालवायचे आहे.. होना?
- तेजल.
(PC)

Comments

  1. ह्या माणुसकीच्या गोष्टी फक्त social media वर शेयर करण्यापुरत्या मर्यादित नको रहायला. त्या जगायच्या आहेत.. यंत्रवत जगणं सुकर बनतं पण जीवन यंत्र बनू नये. ते आपल्याला एकमेकांसोबत माणुसकीनेच घालवायचे आहे.. होना?
    Mast

    ReplyDelete
  2. Thank u so much for the appreciation.. हे घड़ण्यासाठी नेहमीच तयार राहू..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine