नदी
इतका गोडवा की समुद्रात जातांना खारे होऊ याची चिंता नाही, तर आपल्या जाण्याने त्याची विशालता टिकणार ही समज असणारी नदी.. तिच्यासारखीच.. ती तर स्वतः बद्दल इतकी आश्वस्त आहे की, तिच्या बांगडीने सुद्धा किनाऱ्यावर थैमान माजू शकतं. "नदिया किनारे हेराए कंगना.." मागच्या डोळ्यांच्या लेखात, " पी लू तेरे नीले नीले नैनोसे शबनम" यावर लिहायचं राहून गेलं असलं तरी आत्ताच्या- नदीच्या लेखात, या गाण्यातलं - " जिस तरह तू खोई हो नदी .. " हे मात्र miss नाही होणार. ती नदीसारखीच हरवून जाते सागरात. तो सागरासारखाच कुठे स्थिर, कुठे अस्थिर पण तरी शांत होतो तिच्या येण्याने. "पी लूं तेरी धीमी धीमी लहरों की छमछम" .. ती नुसती येत नाही, सगळं पार करून येते. तेव्हा कुठे शांतता मिळणार असते. " इन प्यार की राहों में पत्थर हैं कितने, उन सब को ही पार किया| इक नदी हूँ मैं, चाहत भरी आज, मिलने सागर को आई यहाँ " तिला जर विचारलं कुठे चालली मुरडत तर घाबरत, लाजत नदीसारखंच समुद्राला भेटायला चालले असं सांगेल. " एक नदी से मैंने पूछा, इठला के चलती कहाँ? ड...