Posts

Showing posts from January, 2026

एकाच शहरात असणं..

Image
  एखादी व्यक्ती आपल्या शहरातून गेल्याने, फक्त त्या व्यक्तीची आठवण नाही येत.  तिच्यासोबत आठवते भेट घेण्याची ती प्रत्येक जागा, तिथे असलेले पाखरू- झाड, अनुभवलेली हवा -पाणी -ऊन, रस्ते, खाल्लेले अन्न, घेतलेला चहा- कॉफी..       आपल्याला इतकं काही आठवणार, त्या व्यक्तीला नुसते आपण आठवलो तरी खूप......        एका शहरात राहून भेट नाही झाली तरी ठीक, पण आपण जवळच कुठेतरी आहोत ही भावनाही बरंच काम करून जाते.  म्हणून आहोत तोपर्यंत, लवकर उठायची सवय नसेल तरी एक दिवस उठावं, सोबत सूर्योदय पाहून यावा, एक दिवस कामातून लवकर फ्री होऊन सूर्यास्त सोबत पाहावा. शहरात मोठ्या इमारतींसमोर नसेल जमणार. तर तशी जागा शोधावी. त्याच शहरात, सोबत नसतांना जेव्हा तो सूर्यास्त पाहिला जातो ना, तेव्हा बरं झालं काही संध्याकाळ तर होतो सोबत असं वाटून जातं. या विचारात असतांनाच तो सूर्य महामार्गावरच्या पुलाआड जातो. आपण गाडीच्या आरशात पाहत राहायचं. सूर्याचं दिसणं आणि गायब होणंही. माणसं पण असतातच की, आयुष्यात. फक्त काही वेळापुरतं पुलासारख अंतर येतं.         जे कधी...