अभ्यास दौरा (16-12-2017) एक आठवण
ऐरवी, ५ मिनीटांनी उठू असं म्हणत उशिरा उठणारे आपण बाहेर कुठे जायचं असल्यावर बरोबर वेळेत उठतो तेव्हा आज तर स्टडी टूर कम ट्रिप.. वेळेत जाग तर येणारच होती. मी पण पटापट सगळं आवरुन आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आवारात - जिथे सर्वजण जमणार होते तिथे गेले. ठरल्याप्रमाणे बस वेळेत येऊ शकली नाही, त्यामुळे निघायला थोडा उशिर झाला पण सर्वांच्या उत्साहापुढे उशीर होणं थिटं पडलं. बस मध्ये तर उत्साहाला उधाणच आलं होतं. आमच्या गाण्यांनी इतका वेग पकडला होता की, जसं काही सर्व गाणी आजच संपवायची होती; पण प्रवास कितीही सुंदर वाटत असला आणि कितीही आवडत असला तरी पोटाच्या भुकेसाठी आणि मूळच्या (परत सुंदर) मुद्दयासाठी तो थांबवावाच लागतो. त्यानुसार आमची बस नाष्टयासाठी थांबली, खरंतर नाष्ट्याचे नियोजन विसापूर येथे होते पण केंद्राच्या विद्या मॅडमच्या भावाच्या मदतीने शिरुर येथेच आमच्यासाठी वडापाव आणि चहाची सोय झाली होती. अशातच सहलीचा पहिला टप्पा म्हणजे विसापुर खुले जिल्हा कारागृह येथे आम्ही पोहोचलो. तेथील सर्व कर्मचारी, अधिक्षक-एसपी (SP) यांचे खूप सुंदर मार्गदर्शन लाभले. आम्हांला कैद्य...