Posts

Showing posts from July, 2025

यश आणि स्वप्न

Image
      एक चक्र असतं. त्यात जेव्हा यश आणि त्यामागे धावण्याची तजवीज नसते तेव्हा ताणतणाव कमी असतो. Stress management च्या ट्रिक्स मध्ये एंटरटेनमेंट, socialise होणं हे पर्याय असतात. पण हे पर्याय आपण बाद करतो, जेव्हा आपल्याला यश हवं असतं. असं वाटतं एकदा यशस्वी झालो की, हे पर्याय वापरू. पण कदाचित, यश चक्रव्युहासारखं आपल्याला या पर्यायांपर्यंत पोहोचू देत नाही.  रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चले रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले|          एका स्वप्नासाठी आपण काय नाही करत? बर्‍याच गोष्टी त्याग करतो. जेव्हा त्या स्वप्नाचा काही अंश तरी पूर्ण होतोय असं वाटतं,  तेव्हा मात्र आपलं खाजगी आयुष्य तेवढेच अंश विस्कळित झाल्यासारखं भासतं.           मी आणि किरण, कदाचित आम्ही अवास्तव स्वप्न पाहिले असणार. पण जेव्हा केव्हा स्वप्नांच्या सीमेपर्यंत पोहोचतोय असं झालं, तेव्हा आयुष्यात ज्याच्या सोबत कायमचं राहायचं असं ठरवलं होतं, त्याच्याच पासून दूर राहतोय.         मला तर आता माझ्यात तितकं वाईट वाटा...