लोकसभा 2024
नेहमीप्रमाणे चार जूनला दिवसभर मोबाईल हातात कमीच घेतला, कारण पोरगं लगेच cocomelon लाऊन मागतो. पण लोकसभा 2024 निकाल म्हटल्यावर त्या दिवशी स्वतःला आणि पोरालाही थोडी सूट देऊ वाटत होती. इतका उत्साह आणला ह्या निकालाने. एकट्या बीजेपीच्या सीट्स, इंडिया अलायन्स पेक्षा जास्त असूनही का उत्साह? हा प्रश्न पडू शकतो. पण जे एका पार्टीला सत्तर वर्षात जमलं नाही - जगातील सर्वात श्रीमंत पार्टी होणं, ते ज्या पार्टीने पाच ते दहा वर्षात करून दाखवलं, अशा पार्टीला एकत्र येऊनच तर शह द्यावा लागणार होता. आणि अशा पार्टी विरुद्ध एकट्याने हरण्यापेक्षा किंवा अशा पार्टीचं एकहाती सरकार येण्यापेक्षा हे कधीही चांगलंच वाटणार. मागच्या टर्म मध्ये पोरांना मान्सून, विंटर सेशन शिकवताना बिल्स सरसकट चर्चा न करताच कसे पास होताय हे सांगावं लागायचं. आता सरकार अस्थिर जरी असलं तरी संसदेतली ही मुजोरगिरी तर थांबेल. आयुष्यात माणसं बदलतात इथ पर्यंत ठीक होतं. पण कालपर्यंत शिंदे गटाचे असणारे माणसं आज प्रकाश वाजेंचं स्टेटस ठेवताय. कालपर्यंत मोदी मोदी करणारे, आपल्याला काय बाबा कोणीही आलं तरी रोजचं काम चुक...