Posts

Showing posts from April, 2021

स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग पाच

 आपण बघितले की, भारतातल्या निवडणुका संपल्या. आता जणू काही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा हा देश चालवण्याचा नवा संसार सुरू झाला.. स्वतः बरोबर देशाचीही काळजी करणं यात आलं. भारताचे पंतप्रधान जवारलाल नेहरू देश चालवण्याचे हे काम आपल्या सहकाऱ्यांसोबत करू लागले. युरोपियन तज्ञांसोबत असलेली जवळीक, गांधींसारख्या व्यक्तीचे लाभलेले मार्गदर्शन, सोबतीला स्वतःची आधुनिक, वैज्ञानिक , लोकशाहीविषयक , समाजवादी , धर्मनिरपेक्ष मूल्य इ. सगळ्यांच्या मदतीने भारत पुढे मार्गक्रमण करू लागला.      या देशात अकरा मुख्य भाषा, लाखों पेक्षा जास्त लोक बोलत होते. इतकी विविधता असलेल्या देशात भाषा प्रश्न इतर अनेक प्रश्नांसारखा नाजूक होता. यावर, गांधी आणि नेहरू यांची देशाच्या एकतेसाठीची मतं अशी होती की, आपण हिंदुस्थानी भाषा राष्ट्रभाषा म्हणून निवडावी. ही हिंदुस्थानी भाषा पूर्णतः संस्कृत सारखी देखील नसेल व फारशी भाषेकडे जाणारी सुद्धा नसेल. तर हिंदुस्थानी भाषा संस्कृत व उर्दु यांचे मिलन असावी असे गांधींना वाटत होते. हिंदुस्थानी भाषेला शक्य तितके लवचिक केलेले उत्तम असेल असे गांधी मानत. कारण, यात स्थानिक किं...