स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग १ | India After Independence in Marathi Part 1
स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग १ | India After Independence in Marathi Part 1 आज पासून ' स्वातंत्र्यानंतरचा भारत ' हे नवीन सत्र मी घेऊन आलीये. स्वातंत्र्यानंतरचा भारत या सत्रातील पहिल्याच भागाचे नाव आहे - "नवीनच जन्माला आलेल्या भारतासमोरील आव्हाने". भारत नवीनच जन्माला आला म्हणजे भारताची पारतंत्र्यातून सुटका झाली आणि स्वतंत्र भारतापासून एका नव्या युगाचीच सूरवात झाली. India After Independence in Marathi Part 1 भारत इंग्रजांच्या पाशातून मुक्त होण्यासाठी १५ ऑगस्ट१९४७ ह्या दिवसाची वाट पहावी लागली. मागच्या आठ महिन्यांपासून कामकाजाला सुरवात केलेल्या संविधान सभेची १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाचवी बैठक होती, रात्रीच्या अकरा वाजता ही बैठक राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. ह्याच संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपले ऐतिहासिक भाषण दिले ते थोडक्यात काय म्हणाले जाणून घेऊया. ते म्हणाले, "पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची संपूर्ण किंवा शक्य तितकी वेळ आली आहे . मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपल...