भारताच्या आंतरराष्ट्रीय भू व जल सीमा.
भारत आणि आंतरराष्ट्रीय सीमा असं नुसतं ऐकलं जरी ,तरी भारतीयांच्या डोळ्यासमोर हमखास येणारी सीमारेषा म्हणजे पाकिस्तान या देशाची आणि हल्ली सतावणाऱ्या ड्रॅगन चीन ची. परंतु, आजच्या भागात आपण बघणार आहोत- पाकिस्तान आणि चीनसोबत भारताला बाॅडर करणारी प्रत्येक रेषा अथवा लाईन. भारताच्या फक्त भू भागाला बाॅडर करणारे राष्ट्र आहेत, नेपाळ, भुतान आणि चीन व भारताच्या वाॅटर बाॅडऀर बनविणारे देश आहेत- मालदिव , श्रीलंका, इंडोनेशिया, आणि थायलंड. भारताला भू व जलसिमा असणारे तीन राष्ट्र आहेत- पाकिस्तान ,म्यानमार आणि बांग्लादेश. आपण प्रत्येक शेजारी राष्ट्रांशी सीमा करणारे राज्ये आणि त्या राष्ट्रांची भारताला असणारी एकूण किमी मधील सीमारेषा ह्याचा देखील अभ्यास करणार आहोत. भारताशी सगळ्यात जास्त सीमारेषा असलेले राष्ट्र आहे बांग्लादेश. ४०९६.७ किमी लांबीची सीमारेषा भारत आणि बांग्लादेश मध्ये आहे. जगाच्या पाठीवर सर्वात लांब असलेल्या सीमारेषांमध्ये ही पाचवी सीमारेषा आहे. सगळ्यात जास्त लांबीची असलेली पहिली सीमारेषा कॅनडा आणि यु.एस मधील आहे. या सीमारेषेची लांबी ८९००किमी आहे. आता बघू या, बांग्लादेशच्या स...