भारत चीन (भाग 1) | India vs China Marathi Part 1
भारत चीन (भाग 1) | India vs China Marathi Part 1 सुरुवातीपासूनच चीनने शेजारी राष्ट्रांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण आता जागृत झालेल्या सोशल मीडियामुळे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींसारखे चीनचे संबंध भासू लागले आहेत. चीन असं का करत असावं ? कारण , चीन माओ त्से तुंग (१८९३-१९७६) यांचे तत्वज्ञान follow करते. India vs China Marathi Part 1 माओ यांचा विश्वास होता की , कम्युनिस्ट तत्वानेच भारत साम्राज्यवादापासून मुक्त होईल , स्वतंत्र होऊन देखील इतरांचे प्रभुत्व असलेले राष्ट्र अखंड चीन मध्ये समाविष्ट करण्याचे धोरण माओचे असले पाहिजे. त्यासाठी ते Cartographic Aggression वापरत असतात. ज्यात चीन मुद्दाम शेजारी राष्ट्रांच्या नकाशात एखादा भाग स्वतःचा म्हणून दाखवतात. आणि हीच गोष्ट जेव्हा भारताने केली -(ऑगस्ट २०१९ मध्ये अक्साई चीन भारताचा भाग म्हणून दाखविला गेला.) तेव्हा , चवताळून चीन ने पँगोंग त्सो सरोवर , हॉट स्प्रिंग व्हॅली , गेलवान येथे आपले सैनिक सशस्त्रांसोबत तैनात केले. आणि भारताचे कर्तव्य बजावताना लोप पावणारे र...