Posts

Showing posts from May, 2020

भारतातील राष्ट्रवाद

      रवींद्र नाथ टागोर यांच्या मते, भारताची खरी अडचण राजकीय नसून सामाजिक आहे. खरंतर, ही समस्या सर्व राष्ट्रांची आहे. पश्चिमेकडील राजकारणाने तेथील मूल्यांवर वर्चस्व गाजवले आहे आणि भारतही त्याचे अनुकरण करत आहे.      टागोर सांगतात, भारताने खूप संकटातून काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. आपला देश विभिन्न वंशांसोबत एकता शोधत असतो. इथले संत, जसं की नानक, कबीर आणि चैतन्य इ. एकाधिश्र्वराची शिकवण देतात.        ते पुढे म्हणतात," संपूर्ण जग विज्ञानाच्या साहाय्याने एक बनत आहे. आणि असा क्षण येतो जेव्हा आपण समजतो की, एकतेचे मूळ हे अराजकीय आहे." मानवाचा इतिहास हा एकच इतिहास आहे. सर्व राष्ट्रीय इतिहास हे फक्त त्यातील धडे आहेत. आणि भारतीय ह्या महान गोष्टीचा एक भाग आहेत .        केवळ तीच लोकं टिकतात जी सहकार्यात पुढे असतात.  सुरुवाती पासूनच इतिहासात जेव्हा प्रत्येक देशाच्या भौगोलिक मर्यादा  होत्या आणि संवादाच्या सुविधा कमी होत्या ,तेव्हा संघर्ष आणि जुळवून घेणे ह्या गोष्टीह...

ती

पंख नसेल तर पाखरू भरारी कशी मारणार? आणि असलेल्या स्वप्नात बळ नसेल तर उडायला सामर्थ्य कसे लाभणार? तसच सगळे उराशी स्वप्न बाळगूण तर असतात पण त्या स्वप्नांना बळ देण्याच् काम प्रत्येक वेळी होईलच असे नाही. आपल्या कड़े गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायी प्रमाणे एकेकाळी मुलींची स्थिती होती. आता ती परीस्थिती बदलत चालली असली तरी सगळीकडे हा बदल दिसत नाही. ती स्वप्न तर बघते पण त्या स्वप्नांना आभाळ मिळेलच असे काही नाही आणि तिच आभाळ तिला दिसलं तरी त्यात उडण्यासाठी तिचे पंख समाजाने छाटायला नकोत. आपल्याला का प्रत्येक क्षेत्रात पहिली 'महिला' असं लिंग उद्देशक नोंद्वाव लागत? कारण सुरुवाती पासून तिला भेटत असलेल्या संधींचा अभाव हे आहे. हल्ली संधी आहेत त्यांनाही मर्यादा घालून ठेवण्यात येतात. प्रत्येक समाजात कल्पना चावला होऊ शकत नाही कारण तिला तिच्या सारखाच उपवर मिळेल काय? असं समाजमन आपल्या कड़े आहे. पण या सर्वात तिच्या मनाचा विचार कमी होतो. माणसाच्या आयुष्यात शिक्षण, नोकरी, लग्न या अत्यंत महत्व पूर्ण बाबी आहेत पण मुलीच्या बाबतीत काही वेळा ह्या बाबींत तिचा निर्णय डावलला जातो. मुलगी प्रगल्भ, सामंजस असे...

शिक्षण

'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे' असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कारण हे दूध प्यायल्या नंतरची ताकद त्यांनी अनुभवली होती. शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे- आयुष्याची लढाई लढण्याचं.. वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं.. लोकशाहीतील सहभाग वाढवण्याचं.. देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित असेल. त्या करताच देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. आणि आजही आढळून येणारी विविध स्तरांवरील विषमता मिटवण्यासाठी ह्या शिक्षण व्यवस्थेत पुनर्रचना करणं महत्वाचं आहे. आपल्याला हवे असलेले बदल परिणामकारक शिक्षणा पेक्षा गुणात्मक शिक्षणातूनच घडतील. आपल्यापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि हया शैक्षणिक डोलारयाच्या बळकटीसाठी भारताने 1 एप्रिल 2010 रोजी 'शिक्षणाचा मुलभूत अधिकार, कायदा 2009' च्या अन्वये सर्वांना दिला. जास्तीत जास्त मुले शाळेत यावी म्हणून 'मिड डे मिल’, 'सर्व शिक्षा अभियान' सारखी उपक्रमे देखील राबविली जात आहेत. तरीही प्रत्येक उद्दिष्टे सफल होत नसल्याचे आपण पाहतो. खाजगी संस्थांच्या हातात गेलेल्या व्यवस्थेमुळे शिक्षणा...

२९ एप्रिल, सैराट, इरफान खान आणि २०२०.

मृत्यू ठरलेलाच असतो पण तो अपेक्षित नसल्याने त्रास होतो. सर्वत्र मृत्यू तांडव चालू असताना हे प्रकर्षाने जाणवतंय.. काही तारखा अशा अनपेक्षित वळणासाठीच बनलेल्या असतील का? खरंतर हा अतिविचाराचा प्रकार आहे. पण २९ एप्रिल २०१६ रोजी सैराट रिलिज झाला. त्याचा शेवट अनोळखी नव्हता . त्यापूर्वी सुद्धा same घटना, same चित्रपट होऊन गेले होते. पण दिग्दर्शनाची कमाल की, शेवट predict च झाला नाही . आणि जेव्हा शेवट घडला तेव्हा मोठा धक्का बसला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील lockdown मध्ये आपण सगळेच Quarantine होतो. एक एक दिवस मोजून काटत असताना, ज्याला तुमच्या बद्दल ठाऊकही नाही अशा तुम्ही प्रेम केलेल्या माणसाने हे जग सोडल्याची बातमी येते. नेहमीप्रमाणे खोटं असणार असं म्हणत गूगल केलं तर बातमी खरी होती. इरफान खानने हे जग सोडलं होतं. मागच्या दोन वर्षांपासून न्युरो इंडोक्राईन सोबत झगडणाऱ्या इरफानची २९एप्रिल २०२० रोजी झालेली एक्झिट अनोळखी नव्हती. पण ती याच दिवशी चार वर्षांपूर्वी आलेल्या सैराट सारखीच अनपेक्षित होती. See, अतिविचार असं कशावर पण लिहायला भाग पाडू शकतात.. पण तारखा, कलाकृती आणि कलाकार यात महत्त्वाची भूमिका...