Posts

Showing posts from December, 2019

देशाभिमान| Patriotism

         जगाच्या इतिहासात भारतीयांना अभिमान वाटावा, असे खूप काही आहे पण हा इतिहास शेवटपर्यंत तेव्हाच संपन्न राहील जेव्हा सर्व भारतीय त्या इतिहासाला समोर ठेऊन वर्तमानाला देखील वैभवशाली बनवतील. अगदी प्राचीन इतिहासातल्या सिंधू संस्कृतीतील नागरिकीकरणापासून ते आजच्या मेट्रो शहरांपर्यत ह्या भारत भूमीने प्रगती केली आहे. इथल्या राजेरजवाडयांनी परकीय शत्रूपासून आपल्या जनतेला नेहमीच सुरक्षित ठेवण्याचा खास प्रयत्न केला. त्यामुळे अशा पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटत असतानाच आत्ताचे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा सोडून इतर सर्व काही चोख बजावतात, हे पाहून तोच अभिमान उन्माळायला येतो. स्वतंत्र पूर्व आधुनिक भारतातील, परदेशातून शिकून येणारे आणि इथे येउन त्या शिक्षणाला अनुसरून उदारमतवादी धोरणे मांडणारी नेते मंडळी आठवून गर्व वाटू द्यावा, की आत्ताची नक्की काय शिकलेय हे स्वतः ही न सांगू शकणारी आणि ह्या कावेबाजी प्रमाणेच उद्दाम धोरणे मांडणारी मंडळी आठवून लाज वाटू द्यावी हा प्रश्न पडत असतो. विज्ञानाची कास धरून आपल्या शास्त्रज्ञांनी नेहमीच देशाची मान उंचावली आहे. पण ह्या सर्व...