Posts

Showing posts from October, 2019

Classrooms | वर्ग आणि शाळा

Image
                   भारत- एक समृद्ध इतिहास लाभलेला देश आहे. ह्या इतिहासाला तिथल्या संपत्ती सोबतच ज्ञान आणि बुद्धीचीही जोड़ लाभली होती. आजही आपला देश सर्व गोष्टींवर मात करत बुद्धीच्या जीवावरच पुढे जातोय. एक व्यक्ती, समाज आणि देश हे शिक्षणानेच पुढे जाऊ शकतात. या जाणिवेनेच प्रत्येक स्वतंत्र अस्तित्वास पूर्वीपासूनच शिक्षणाची जोड़ मिळत आली आहे. आपण सर्व 'गुरुकुला' बद्दल जाणतोच आणि प्लेटोने जगाला जाणीव करून देऊन, काढलेल्या 'अकादमी' या शाळेबद्दलही जाणतोच.. अनेक देशांमध्ये शिक्षकांना अनन्य साधारण महत्व आहे, आणि शिक्षकवृंद त्यास पात्र देखील आहे. एका शिक्षकाच्या आचार, विचारांवर समोरचे अनेक विद्यार्थी घडत असतात. नुकतंच शाळेत टाकलेल्या लहानग्याला जर 'तुला काय व्हावेसे वाटते?' असा प्रश्न विचारला तर उत्तर 'टीचर' असे येते. कारण त्या कोवळया मनाने आजवर अनुकरण करावं असं कोणी त्याला भेटलेलच नसतं. घरची मंडळी रोज डोळ्यादेखतच असतात पण अचानक आलेल्या ह्या अनोळख्या अवलियाने छोटयांचं अवघं विश्वच व्यापायला सुरुवात केलेली असते. तेव्हा ह्या...