Posts

Your vibe attracts your tribe

     We kept wrapping the days after all the house chores and my recordings.       असंच एका दुपारी, नवरात्रीच्या दिवसात, सगळं आवरुन  झोपतच असतांना (after all the tablet dosage during pregnancy, i felt sleepy) देवीचे सूर निरागस होत होते. तशातच संध्याकाळही झाली, मग आम्ही एका so called classy कॅफे मध्ये गेलो. तिथे काहीतरी पांचट खाऊन, खिशाला घबाड पाडल्यानंतर cafe ideal मध्ये गेलो. तिथे मन आणि पोट भरत आल्यानंतर juke box वर गाणं लागलं - 'ओ रे लम्हे तू कही मत जा, हो सके तो उम्र भर थम जा'. पण, असे लम्हे कधीच थांबत नाही. उलट ते आणखी भुर्रकन उडून जातात. फक्त आपली माणसं सोबत असली की तेच तेच लम्हे सतत जगत असल्याची Feeling तरळत राहते.     या नंतर, juke box कॅफे शोधून cafe general मध्ये सुद्धा गेलो. पण ते तितकं 'ideal' नाही वाटलं. मग मात्र कोणीही आलं की, cafe ideal च. हा शिरस्ता आम्ही बांधला. आणि आता आम्हीही juke box वर गाणी लावतो.        मागे एकदा मनाली ट्रिपमध्ये मी पहिल्यांदा live music cafe अनुभवला होता. तोही एक छान एक्सपेरियन्स होता. जगण्यासाठी पोट भरण्याचं सुख एकीकडे आणि पोट भर

सायन किल्ला आणि सृजन खबरबात

Image
मातीतून उगवणारं सर्वच 'सृजन' असतं.  It was weekend, we went to Sion fort, Mumbai. Usually I love to jump and run wherever we go but that day I was like if it is testing day, I must take care of myself so I was taking care of my habbits. But then I realised the energy in me is going down suddenly. I can run through all the trek but this time, I got tired even after stepping 4 to 5 steps. I felt like test may come positive. I told my hubby that I am tiring easily but maybe he didnt heard it at that time. And u know what? - in the evening one dark line and one faint line occurred on the pregnency kit. Doctor said, "it is faint positive, do blood test to make it sure." We went immediately to nearby Maternity home which is in Sewri itself. The lab girl said it is positive for sure because I had shown her the earlier test. [She was gonna eat pizza. Oh I rarely eat junk but I love it and I thought what if doctor would banned it 🤪] alas! This is my memory pic of 'we got

मराठी तोरण आणि SoBo

Image
मराठीची प्रत्येक बोलीभाषा मराठीला आणखी समृद्ध करते.  पण पुण्यात आणि मुंबईत राहिल्यानंतर प्रमाणभाषेबद्दल वाटलेली एक गोष्ट म्हणजे पुण्यापेक्षा मुंबईत जास्त अस्खलित मराठी बोलतात. एकदम अलंकारिक भाषा, वाक्यप्रचार, म्हणी असं सगळं मराठी व्याकरण लहानांपासून मोठेही वापरत असतात.  आम्ही नाशिककर यावर फक्त "इ भाई, डायरेक्ट टीव्हीमधली मराठी ना. विषयच खोल ए यांचा." असं म्हणून खूश होतो. आणि एवढ्या विविधतेने बोलल्या जाणार्‍या मायबोलीवर आणखी प्रेम जडत जातं.             हे मी मागच्या वर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने लिहिलं होतं आणि काल महाराष्ट्र दिन. तेव्हा मला आम्ही मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंग मधल्या एका घराचं दार आठवलं. त्याचा फोटो अपलोड केलाय. या दोन गोष्टींचा संबंध असा की, सगळं जग बदलतंय, "aesthetic हवं सर्व असं" म्हणत आपली घरं सजताय. पण हा SoBo (South Bombay - दक्षिण मुंबई) मधल्या एका दाराचा फोटो. तिथलं तोरण जुन्या मराठी घरांची आठवण करून देतंय.सोबो मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाषा सुद्धा किती बदलली.. पण त्याच सोबोत मराठी संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी अशी दिसूनही येत असते.   

मराठी blogging

 आपल्या लिहीण्यामागे हेतू काय असतो हे प्रत्येक वेळी सांगता येईलच असं नाही. पण या लिखाणाचे फायदे दुसर्‍या मराठी blogger ने सांगितले तर?  आणखी असेच मराठी blogs वाचण्यासाठी -  https://mazablog.online/marathi-blog-list-2023/ Mazablog.online

Youth ki Awaz

  महिलांचा अधिकार आणि मिळणारा न्याय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्ताने लिहिलेला लेख. 

गोष्ट विषारी!

Image
  एखादी छोटी गोष्ट मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते. जसं की, 'राझी' मध्ये सहमतने वापरलेली Ricin. आपल्या नवर्‍याच्या मोठ्या भावाला मारण्यासाठी ती सेम त्याच पद्धतीने Ricin वापरते ज्या पद्धतीने जगात पहिल्यांदा या विषाचा वापर केला गेला होता. म्हणजे छत्रीमधून Ricin inject करते. पण जगाच्या इतिहासात Ricin पहिल्यांदा 1978 मध्ये वापरली गेली असं आपल्याला इतिहासही सांगतो आणि ब्रेकिंग बॅड मध्ये Walt सुद्धा Jesse ला सांगतो तेव्हाही आपण ऐकतो. आणि सहमतची घटना साहजिकच त्या आधीची आहे कारण तो भारत पाकिस्तान संघर्षांमधला बांगलादेश मुक्तीच्या वेळचा अर्थात 1971 चा काळ आहे.         इथे मेघना गुलजार यांनी तेवढी liberty वापरली असणार. आशुतोष गोवारीकर यांनी 'जोधा अकबर' चित्रपटात Ricin वापरले आहे. जे महाम अंगा यांना राणी जोधा कडे सापडते. त्या आवई उठवतात की, हे राणी जोधाने शहेनशाह अकबराला मारण्यासाठी आणलेय. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात Ricin विष प्रयोग झालाही असेल पण ठोस पुरावा फक्त आधुनिक तोही शीत युद्धाच्या पूर्वीचा काळ देतो. Bulgaria च्या जॉर्ज मार्कौव् या पत्रकाराला मारण्यासाठी KGB या सोविएत

चंद्र आणि आपण!

Image
          आपण मनुष्य स्वतः खूप गोष्टी बनवतो. पण त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचं आपल्याला लागलेलं येड काही कमी होत नाही. एकदा ढग बघितल्यावर कसे मनात अशक्य विचार मनात येतात, हे लिहिलं होतं.  -  इथे क्लिक करा       आज अशाच आपल्या सगळ्यांनाच खिळवून ठेवणाऱ्या चंद्रा विषयी नाही, पण त्याला पाहून जे होतं त्या विषयी लिहू वाटलं. खरं, प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं. जसं प्रत्येकाचं अवकाश वेगळं, तसा प्रत्येकाचा चंद्र आणि त्याला पाहून येणारा विचार पण वेगळा.      एकदा चंद्राच्या प्रकाशात एकदम भूतकाळ आठवला. तोच भूतकाळ जो माझ्या आजूबाजू असणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. तरीही वेळेसोबत मागे पडलेल्या किंवा आपण मागे सोडून आलेल्या गोष्टी, ज्यांच्या सोबत जगलो त्यांच्याच सोबत पुनः बोलल्याने कसलं भारी वाटतं. भूतकाळात घडलेल्या गोष्टींना वर्तमानात सहसा फारसं महत्व नसलं तरी, त्या त्या वेळी आपल्या आयुष्याला काय किंमत होती याची जाणीव होते. जिथे की आज आपण स्वतःच्या नजरेत जास्त महत्वपूर्ण असतो. पण जग आज त्यामानाने पावलोपावली आपली किंमत काढत असतं.                      कसं ना.. एवढा मनमोहक चंद्र तो! पण त्याल