Decoding नैना...
लेखन हा फक्त आवडीचा विषय आहे. त्यात कुठलीच आसक्ती करू वाटत नाही. आपला एक ब्लॉग आहे, त्याला बोटावर मोजण्याइतके वाचक आहेत. यावरच माझा छंद खूश आहे. अशी सुरुवात करण्याचं कारण म्हणजे, त्या बोटावर मोजण्याइतक्या येणार्या प्रतिक्रिया.... ज्यामुळे आपल्याकडून खरंच ठिकठाक जरी लिहिलं जात असेल तरी पुढचा लेख हाती घेऊ वाटतो. हा झाला दृष्टिकोन. दृष्टी, डोळे, नयन, नैना. आपल्या लेखात कधी चंद्र असतो, कधी निसर्ग असतो तर कधी आयुष्य. आज थोडंसं विषयाला लांबवून 'नैना' कडे नयनांनीच पाहू वाटतंय. हिंदी नैनाला मराठी डोळ्यांनी बघूयात. बाळ असल्यापासूनच प्रेम भरलेल्या नजरा आपल्याकडे पाहत असतात. आपणही त्या वयात संवादाचं दुसरं काही माध्यम नसल्याने डोळ्यांनीच बोलू लागतो, रडतो, हसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांभाळणाऱ्या आईला, आजीला, बाबाला, आजोबांना ते समजतं. हा इथून सुरू होतो 'खामोशी'तून आपलं म्हणणं पोहोचण्याचा प्रवास. ....आणि माध्यम तेच- नयन.... समोरच्याला वेड लावणारे डोळे.. " आँखों से तूने ये क्य...