Posts

Showing posts from February, 2025

सिलसिला

 असलेल्या गाण्याला संगीत देणं कठीण की असलेल्या संगीतासाठी गाणं लिहिणं कठीण? मुळात हा प्रश्नच गौण ठरतो, जेव्हा एका उत्कृष्ट संगीताचा आणि गीतकाराने लिहिलेल्या सुंदर गीताचा नजराणा आपल्यापुढे येतो.          काही वर्षांपूर्वी 'सकाळच्या सप्तरंगमध्ये' जगदीश खेबूडकर त्यांचे गीत लिहिण्याचे अनुभव मांडत असत. त्या वयात काय नवल वाटायचं, संगीत तयार असतांना त्यात शब्द भरून जादू ऐकवणाऱ्यांबद्दल. ही जादू जगदीश खेबूडकरांनी केली, आणखीही गीतकार करत असणार.. या सर्वांत विशेष कौतुक वाटलं ते जावेद अख्तरांचं..          आपल्या सर्वांच्याच मनावर राज्य करणारं, 'संदेसे आते है' हे गाणं सगळ्यात शेवटी म्हणजे अगदी चित्रपटही पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लिहिलं. अर्थात संगीत तयार, सिनेमाची कहाणी तयार. आणि मग त्यांनी शब्दबद्ध केलं ते संदेसे.. 'ऐ गुजरने वाली हवा' सोबत आपल्यालाही उडायला लावणारे जावेद साहेब.. आपला साथीदार आपल्यापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी हे गाणं सर्वांत जवळचं.        अफरीन अफरीन, चालू असतांना 'जिस्म जैसे है अजन्ता की मुरत कोई' पहिल्...