Posts

Showing posts from January, 2023

गोष्ट विषारी!

Image
  एखादी छोटी गोष्ट मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते. जसं की, 'राझी' मध्ये सहमतने वापरलेली Ricin. आपल्या नवर्‍याच्या मोठ्या भावाला मारण्यासाठी ती सेम त्याच पद्धतीने Ricin वापरते ज्या पद्धतीने जगात पहिल्यांदा या विषाचा वापर केला गेला होता. म्हणजे छत्रीमधून Ricin inject करते. पण जगाच्या इतिहासात Ricin पहिल्यांदा 1978 मध्ये वापरली गेली असं आपल्याला इतिहासही सांगतो आणि ब्रेकिंग बॅड मध्ये Walt सुद्धा Jesse ला सांगतो तेव्हाही आपण ऐकतो. आणि सहमतची घटना साहजिकच त्या आधीची आहे कारण तो भारत पाकिस्तान संघर्षांमधला बांगलादेश मुक्तीच्या वेळचा अर्थात 1971 चा काळ आहे.         इथे मेघना गुलजार यांनी तेवढी liberty वापरली असणार. आशुतोष गोवारीकर यांनी 'जोधा अकबर' चित्रपटात Ricin वापरले आहे. जे महाम अंगा यांना राणी जोधा कडे सापडते. त्या आवई उठवतात की, हे राणी जोधाने शहेनशाह अकबराला मारण्यासाठी आणलेय. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात Ricin विष प्रयोग झालाही असेल पण ठोस पुरावा फक्त आधुनिक तोही शीत युद्धाच्या पूर्वीचा काळ देतो. Bulgaria च्या जॉर्ज मार्कौव् या पत्रकाराला मारण्यासाठी K...