बदलत्या भारतीय सिनेमाचं रूप
spoiler_alert. सिनेमातून आजवर कधी कोणी दगड मारला नव्हता. मारला तरी तो लागला नसता. पण फॅन्ड्री मध्ये जब्ब्याने मारलेला दगड प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला चांगलाच बसला. सिनेमात नायक नायिका त्यांच्या घरच्यांना मंजूर नाही म्हणून प्रेम विवाह करून मृत्युमुखी पडलेली बघणं खरंतर भारतीय समाजाला नवीन नाही. रिअल आणि रील अशा दोन्हीही आयुष्यात सतत ही उदाहरणं आम्ही बघत असतो. पण पहिला half विनोदी, नंतरचा half गंभीर पण तरीही आता सगळं काही नीट होणार अशी शाश्वती मिळतच असताना आर्ची पर्शा गेले. नुसते गेले नाही आपल्या आईवडिलांच्या रक्ताने माखलेला पाय घेऊन तात्या घराबाहेर आला, इतका वेळ थेटर मध्ये शांततेत सिनेमा पाहू न देणारे आमच्या पुढे बसलेले कॉलेज कुमार सुन्न होऊन बाहेर पडले. (प्रत्येकाची अशीच अवस्था होती) असा शेवट कोण करतं? बरं आता आम्हाला कळलं ए.. तू कसं फसवतो ते.. म्हणून झुंड मध्ये डॉनला काही फुटबॉल खेळायला परदेशात जाता यायचं नाही अशी दुःखी गाठ मनाशी बांधत असताना तू त्याला जाऊ दिलं, पण आयुष्याचा धडा शिकवून. तू नेहमी व्यवस्था मोडीत काढतो आणि ...