महिला दिन २०२२ .
उत्क्रांती विषयक नियमांमध्ये लेमार्कचे नियम स्वयंपूर्ण नव्हते - डार्विनच्या नियमांसारखे. म्हणून त्याची Theory उत्क्रांतीसाठी चुकीची ठरली. पण एरवी मात्र त्याचे म्हणणे बरोबर असल्यासारखे वाटते. स्वतः तील बदल (मी लिहते ए त्या केस मध्ये-वागणं) दुसऱ्या पिढीकडे पोहोचवलं जात असते (बऱ्याचदा ). लेमार्कने Theory of inheritance of acquired characters मांडली होती . ज्यातील फक्त disuse of organ मान्य करण्यात आले. पण पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. जीवशास्त्र सोडून त्याची Theory of Inheritance ही कधी कधी आजवर वापरली गेली असे वाटते . म्हणजे जसं की, स्त्रियांची ड्रायविंग . आपल्या कडे देश स्वतंत्र झाला आणि संविधान लिहिले गेले तेव्हापासूनच महिलांना अनेक अधिकार देण्यात आले. (उदा . मतदानाचा अधिकार , पण म्हणून पुरुष करतात तितके मतदान स्त्रीयांनी ना पहिल्या लोकसभेत केलं ना मागच्या लोकसभा २०१९ मध्ये केलं. अपवाद - तामिळनाडू, मणिपूर हे राज्ये आणि पुडुचेरी हे कें.प्र ). तसंच गाडी चालवण्याचं पण आहे , शिक्षणाचं पण आहे आणि नोकरीचं प...