लग्न आणि नाक
आमची मुलगी आमचं नाक आहे, असं ऐकल्यावर मुली वास आणि Respiratory चं काम कधी पासून करायला लागल्या असा प्रश्न मला पडला. बरं, तुमच्यासाठी करत असतील त्या हे कार्य पण बाहेरच्यांना का सांगताय तुम्ही हे ओरडून.. oh! Hold on. इतरांच्या मुलींनी त्यांच्या स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणून acidity झाली का? पण आता काय करणार ..नसतात त्या नाक किंवा पोट, त्यांच्या त्यांच्या घरच्यांचं.. आणि तुमच्यासाठी शरीराची कामं करायला नसतील त्या रिकाम्या.. मग त्यात फार वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये किंवा तुमच्या चांगलं फंक्शन करणाऱ्या नाका बद्दल गर्व वाटू देण्यासारखं सुद्धा काही नाहीये. कारण ,तुमच्या साठी नेहमीच चांगलं काम करणाऱ्या नाका सोबत मात्र कधी कधी तुमचा तुक्का चुकतो ना!.. (हो कधी कधीच चुकतो, कारण लग्न लव असो की अरेंज तुक्केच असतात, लागला तर लागला).. लग्न आणि नाक पण मग मुलं मुली स्वतःचा निर्णय योग्य ठरल्यावर स्वतःला स्वतःचं नाक असल्याचं घोषित करत नाही, मग हे बाकीचे त्यांच्या वर का बरं भारी भरत असतील? मुळातच हा खूप चाऊन चोथा झालेला विषय आहे, तरी लिहायची...