Posts

Showing posts from July, 2020

भारत चीन (भाग २) | India vs China Marathi Part 2

Image
भारत चीन (भाग २) | India vs China Marathi Part 2 मागील ब्लॉग मध्ये सांगितल्यानुसार आपल्या लष्करी प्रगतीचा आढावा असा घेण्यात येईल -बांगलादेशच्या जन्म घेण्याच्या प्रक्रियेत, ४ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या Navyने पाकचे कराची पोर्ट उध्वस्त केले. हे बंदर ६ दिवस जळत होते. आपल्या 'operation Tridentच्या' या विजयामुळे ४ डिसेंबर हा Navy day म्हणून साजरा केला जातो. पार्श्वभूमी माहीत करून न घेता, आजचा भारत १९६२चा भारत राहिला नाही, असं म्हणताना १९६७ पासूनच्या १९७१ सारख्या विजयांचा आपण राजकारणासाठी अपमान करत असतो, हे समजून घ्यायला हवे.  India vs China Marathi Part 2     सुरक्षा योजना अभ्यासून तज्ज्ञांनी सांगितले की, भविष्यात सावध राहताना अरुणाचल प्रदेश मधील तवांगची सुरक्षा गरजेची आहे. खरंतर, आपले सुरक्षा दल तयार होते पण रस्त्यांचे जाळे अजूनही बांधले गेले नव्हते. त्यामुळे संरक्षण विषयक पायाभूत सुविधा करण्याचे ठरविण्यात आले.  १९८३ साली IB ची टीम ' सुमदोरोंग चू ला' ,येथे गेली. तिथे संरक्षण दल उन्हाळयात जात असे. आणि हिवाळ्यात पुन्हा येत असे. असं दोन वर्ष झाल्यानंतर भारतीय दलांना ल...