जागतिकीकरण आणि पर्यावरण | globalization and environment.
सुरुवातीला एकटा मानव व नंतर संपूर्ण मानवी संस्कृती बहरू लागली आणि एक प्रकारे भविष्यातल्या जागतिकीकरणाचा पायाच आपण घातला. ही प्रक्रिया मानवी गरजा भागविण्यासाठी महत्वाची मानली तरी निसर्गाच्या गरजांंचा विचार करायला आपण सोइस्कर विसरलो! आपल्या उत्क्रांती मध्ये पर्यावरणाचा चेहरा कसा बदलत गेला किंवा आपण त्यासाठी कसं कारणीभूत ठरलो, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 20 लाख वर्षांंपूर्वी, प्लायोसिन (प्राचीन) अश्मयुगात जेव्हा मानवी समाज संथ गतीने दगड आणि वनस्पतींंच्या मदतीने प्रगती करत होता तेव्हा हवामानात नैसर्गिक बदल होत गेले. 10 लाख वर्षांंपूर्वी, प्लीस्टोसीन (मध्य) अश्मयुगात जेव्हा मानव आफ्रिकेतून युरोप आणि आशिया मध्ये स्थलांतरित होऊ लागला, आणि खऱ्या अर्थाने आगीचा शोध, समूह, निवारा यासारख्या सामाजिक संस्कृती कड़े वाटचाल करू लागला, तेव्हा हिमयुगास सुरुवात झाली होती. 10000 वर्षांपूर्वी पर्यंत सामाजिक प्रगती वेगाने सुरु झाली होती, हवामानात सौम्य बदल होऊ लागले, अंटार्क्टिका सोडून इतर भूखंडावर मानवाचे अस्तित्व दिसू लाग...